असा बॉस प्रत्येकालाच हवा; कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून दिल्या मर्सिडीज कार 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 30 सप्टेंबर 2018

खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कायमच अप्रायझलवर डोळा असतो. वर्षाकाठी मनासारखी पगारवाढ मिळाली नाही की सगळ्याच कार्यालयात चलबिचल पाहायला मिळतो. पण सूरतमधले हिरे व्यापारी सावजी धनजी ढोलकिया या सगळ्याला अपवाद ठरलेत. दिलदार मालक म्हणून कर्मचाऱ्यांच्या मनात घर करणाऱ्या सावजींनी यावेळी आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून चक्क मर्सिडीज कार दिल्या आहेत.

जीएलएस 350 डी कारची किंमत जवळपास सव्वा कोटींच्या घरात आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हरेकृष्णा एक्सपोर्टर कंपनीत 25 वर्ष सेवा दिलीय त्यांना सावजींनी ही अनोखी भेट दिलीय. सावजींचा हा दिलदारपणा इथवरच सिमीत नाही. तर त्यांनी याच कार्यक्रमात आपल्या कंपनीतील एका मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाईंकांना 1 कोटींचा धनादेश दिला. 

गेल्या वर्षी याच सावजींनी आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून फ्लॅट दिले होते. त्याआधी प्रत्येकाला कार देऊन सावजींनी या कर्मचाऱ्यांची मनं जिंकली होती. त्यामुळे आपल्याला असा बॉस कधी मिळणार असाच प्रश्न आता प्रत्येक खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला नक्की पडला असेल. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live