गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधात हिंसक आंदोलन; 50 हजार उत्तर भारतीय गुजरातबाहेर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

युपी बिहारी किंवा परप्रांतीय नागरिकांविरुद्ध आता गुजरातमध्येही आवाज उठलाय. साबरकांठा इथं एका 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्यानं गुजरातमध्ये सर्वत्र खळबळ उडाली. विशेष म्हणजे या घटनेतील आरोपी कामगार हा मूळ बिहारचा आहे.

त्यामुळं गुजरातमध्ये यूपी-बिहारींविरोधात संतापाची लाट उसळली. उत्तर भारतीयांवर काही ठिकाणी हल्ले होऊ लागलेत. त्यामुळं हिंसेच्या भीतीनं उत्तर भारतीय कामगारांनी पलायन करायला सुरुवात केलीय.

या वादात संजय निरुपम यांनीही उडी घेतलीय. एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही वाराणरीला जायचंय हे  लक्षात असू द्या असा इशाराच निरुपम यांनी दिलाय. 

उत्तर भारतीयांविरोधातील हिंसाचारामुळं गुजरामधील 6 जिल्हे प्रभावित झालेत. गुजरातमधील युपी-बिहारींना हाकलून लावण्याची मोहिमच गुजरातमध्ये सुरू झालीय. कायदा-सुव्यवस्था राखण्याचं आव्हान आता यंत्रणांसमोर आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live