गुजरातमधील कच्छ सीमेजवळ एका 50 वर्षांच्या पाकिस्तानी नागरिकाला सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) ताब्यात घेतले

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 मार्च 2019

नवी दिल्ली: गुजरातमधील "कच्छचे रण' या भागाला लागून असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेजवळ एका 50 वर्षांच्या पाकिस्तानी नागरिकाला सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) ताब्यात घेतले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

बीएसएफच्या गस्ती पथकातील जवानांनी सीमेवरील 1050 क्रमांकाच्या खांबाजवळ एका पाकिस्तानी नागरिकाला ताब्यात घेतले असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीकडे कुठल्याही प्रकारच्या संशयास्पद वस्तू किंवा कागदपत्रे आढळून आले नाहीत, असे सांगण्यात आले. बीएसएफच्या पथकाने आव्हान दिल्यानंतर संबंधित व्यक्ती तातडीने शरण आला, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. गुजरातमधील "कच्छचे रण' या भागाला लागून असलेल्या सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी बीएसएफकडे आहे.

Web Title: Pakistani Man Arrested In Gujarats Rann Of Kutch says Officials

संबंधित बातम्या

Saam TV Live