गुजराती पाट्या तोडफोडीचं लोण कांदिवलीपर्यंत.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 मार्च 2018

कालच्या राज ठाकरेंच्या भाषणानंतर आता गुजराती पाट्यांचं तोडफोडीचं लोण आता कांदिवलीपर्यंत पोहोचलंय. मुंबईच्या ​कांदिवलीतील एम जी रोड परिसरात मनसेच्या सैनिकांकडून गुजराती पाट्या असेलेल्या एका दुकानाची तोडफोड करण्यात आलीय. गुजरातीत पाट्या असलेल्या राजू ढोकळावाल्याला सांगून आणि मराठी परिपत्रक देऊनही त्यानं गुजरातीच पाटी लावल्यामुळे मनसैनिकांनी हे मनसे स्टाईल आंदोलन केलंय

दरम्यान, मोदी आणि गुजरात्यांना टार्गेट करत आगपाखड केल्यानंतर आक्रमक मनसैनिकांनी रात्रीच मुंबई-अहमदाबाद मार्गावरील गुजराती दुकानांना निशाणा बनवलं. राज ठाकरेंच्या भाषणानंतर आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी खळखट्याक आंदोलन करत मुंबई-अहमदाबाद मार्गावरील हॉटेल-दुकानांवरील गुजराती पाट्या हटवल्या. घोषणा देत सुमारे 10 ते 12 कार्यकर्त्यांनी या पाट्या हटवल्या.. 

संबंधित बातम्या

Saam TV Live