कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारचा आज शपथविधी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 मे 2018

एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटकच्या जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. यावेळी कुमारस्वामींसह 34 मंत्रीसुद्धा शपथ घेणार आहेत. विधानसौधच्या प्रांगणात होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला दोन डझनहून अधिक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेसचा सत्तास्थापन सोहळा म्हणजे, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरोधकांची मोट बांधण्याची वेळ असल्याची चर्चाही जोरात आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत, मल्लिकार्जुन खरगे आदी नेते उपस्थित राहतील.

एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटकच्या जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. यावेळी कुमारस्वामींसह 34 मंत्रीसुद्धा शपथ घेणार आहेत. विधानसौधच्या प्रांगणात होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला दोन डझनहून अधिक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेसचा सत्तास्थापन सोहळा म्हणजे, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरोधकांची मोट बांधण्याची वेळ असल्याची चर्चाही जोरात आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत, मल्लिकार्जुन खरगे आदी नेते उपस्थित राहतील. सोनिया गांधींच्या उपस्थितीबाबत मात्र साशंकता आहे. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live