गारपिटीमुळे रबी पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भाला रविवारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला. गारपिटीमुळे रबी पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसंच गारांचा तडाखा आणि वीज कोसळून राज्यात सात जणांचा बळी गेला. तर अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे वीज कोसळून 7 जनावरे दगावली. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहेत. तूर, हरबरा, गहू, ज्वारी ही काढणीला आलेली पिके गारांच्या तडाख्यात सापडल्याने भुईसपाट झाली. तर संत्रा आणि द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भाला रविवारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला. गारपिटीमुळे रबी पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसंच गारांचा तडाखा आणि वीज कोसळून राज्यात सात जणांचा बळी गेला. तर अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे वीज कोसळून 7 जनावरे दगावली. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहेत. तूर, हरबरा, गहू, ज्वारी ही काढणीला आलेली पिके गारांच्या तडाख्यात सापडल्याने भुईसपाट झाली. तर संत्रा आणि द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वत्र गारांचा खच साचल्याने जालना, परभणी व बीड जिल्ह्यात तर काश्मीरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live