केसांनी कापू नका सौंदर्याचा गळा; केसांवर भलते-सलते प्रयोग करण्याआधी हा व्हिडिओ एकदा पाहाच

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

तरूण असो किंवा तरूणी केसांमुळे त्यांचं किंवा तिचं सौंदर्य अधिक खुलतं. त्यामुळं आताची तरूणाई केसांची ठेवण आणि केसांची अधिक काळजी घेताना दिसतात. पण केसांची काळजी म्हणजे त्यांच्यावर प्रयोग नाहीत बरं का?

केसांवर केलेले प्रयोग फसल्यानं म्हैसूरच्या एका तरूणीनं आत्महत्या केलीय. नेहा असं या तरूणीचं नाव होतं. तिनं केस स्ट्रेटनिंग केले होते. पण त्यानंतर केस गळू लागले. केस एवढे गळाले की टक्कल पडण्याची वेळ आली. त्यामुळं नैराश्यग्रस्त झालेल्या नेहानं आत्महत्या केली. केसांवर अनावश्यक अति प्रयोग केल्यानंच ही वेळ आल्याचं तज्ज्ञ सांगतात.

अवेळी केस गळू लागले किंवा केस विरळ झाले तर घाबरून जाऊ नका किंवा टोकाचा विचार करू नका असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.

केसांची काळजी घेणे म्हणजे त्यांच्यावर प्रयोग करणं नाही. निव्वळ अनुकरणातून केसांना हानी पोहचवू नका आणि केसांच्या नादात आयुष्याची दोरीही कापण्याचा आततायीपणा करू नका
 
संबंधित बातम्या

Saam TV Live