हमीद दाभोलकर, मेधा पानसरेंच्या हत्येचा डाव? 'त्या' आरोपीच्या डायरीत सापडली दोघांची नावं

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरेंच्या हत्येनंतरही कट्टर विचारसरणीच्या हिंदुत्ववादी संघटनांचा धोका कमी झालेला नाही. दाभोलकर पानसरेंच्या मारेकरी पकडले जावेत यासाठी पाठपुरावा करणाऱ्या हमीद दाभोलकर आणि मेधा पानसरेंच्या जिवाला धोका निर्माण झालाय. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित अमोल काळेच्या डायरीमुळे हा खळबळजन खुलासा झालाय.

या डायरीत नेक्स्ट टार्गेट हमीद दाभोलकर आणि मेधा पानसरे असं लिहण्यात आलंय. पोलिसांनी खबरदारी  म्हणून हमीद आणि मेधा पानसरेंना  एक्स दर्जाचं पोलिस संरक्षण दिलंय.

दाभोलकर-पानसरे- कलबुर्गी आणि त्यानंतर झालेल्या गौरी लंकेश या हत्या एकाच कटाचा भाग असल्याचा आरोप करण्यात येतोय. या नव्या माहितीमुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपांना बळ मिळालंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live