HappyBdayPMModi- संन्यासी बनण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घरातून पळून गेले होते; मोदींचा जीवनपट उलगडणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

1) आज नरेंद्र मोदी आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या शाळकरी मुलांसोबत संवाद साधतील. 

2) आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी 600 कोटी रुपयांच्या नव्या योजनांचा शुभारंभ करणार आहेत.

3) नरेंद्र मोदी यांचा जन्म गुजरात येथील वाडनगर येथे झाला. नरेंद्र मोदी हे सहा बहीण भावांमध्ये तिसरे आहे. स्वतंत्र भारतात जन्म घेणारे ते भारताचे एकमेव पंतप्रधान आहेत. 

4) मोदी यांच्या गावात त्यांना गावकरी प्रेमाने 'नरिया' नावाने हाक मारतात. त्यांची आई आजही त्यांना याच नावाने हाक मारते. 

5) नरेंद्र मोदी यांना अभिनय करायला आवडायचा. त्यांनी लहाणपणी थिएटर सुध्दा केले आहे.

6) नरेंद्र मोदी वडनगर येथील भगवताचार्य नारायणाचार्य शाळेत शिकत होते. त्यांना साधू संतांना बघणे फार आवडायचे. त्यांना स्वतः संन्यासी बनायचे होते. शाळेतील शिक्षण संपल्यानंतर संन्यासी बनण्यासाठी नरेंद्र मोदी घरुन पळून गेले. या दरम्यान ते पश्चिम बंगाल येथील रामकृष्ण आश्रम सह बऱ्याच जागी फिरले. शेवटी ते हिमालयात पोहोचले. 

7) उत्तराखंड हे ठिकाण मोदी यांच्यासाठी खास आहे. येथील केदारनाथ या ज्योर्तिलिंगाच्या शेजारील गरुडचट्टी येथे राहून नरेंद्र मोदी यांनी तपस्या केली. अनवानी पायांनी ते केदारनाथ मंदिरात जायचे. काही काळानंतर ते तेथून परतले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुडले. 1985 ते 1990 या वर्षांत मोदींचे या भागात वास्तव्य होते.   

8) केदारनाथ येथे नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक आधुनिक गुहा तयार करण्यात आली आहे. ज्यात योग, ध्यान, मेडीटेशन आणि आध्यात्मिक शांती यांसाठी सोयी करण्यात आल्या आहेत. गुहेत टॉयलेट, वीज आणि टेलिफोन अशाही सुविधा आहेत. 

9) गोधरा येथे एका रेल्वेतील पन्नास हिंदू प्रवासी जळल्यानंतर गुजरात येथे दंगे भडकले. याचा ठपका मोदींवर बसला. हा ठपका मोदी आजपर्यंत पुसू शकले नाहीत. शिवाय, मुस्लिम विरोधी दंग्यात जवळपास हजार ते दोन हजार लोक मारल्या गेले. मोदी यांनी हे दंगे भडकविण्यास प्रवृत्त केल्याचा आणि हे दंगे शांबविणे मोदी यांना शक्य होते पण तसे त्यांना केले नाही, असे आरोप त्यांच्यावर झाले. 

10) गोधरा हत्याकांड प्रकरण फक्त देशापर्यंतच उरले नाही. तर ते जगभर पसरले. 2005 साली अमेरिकेने मोदी यांचा वीजा नाकारला. 

संबंधित बातम्या

Saam TV Live