हरबरा विकायचाय ? 4 किमीची रांग लावा !

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 28 मे 2018

उस्मानाबादमधल्या लोहारा तालुक्यात हरभरा विक्रीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. लोहारामध्ये यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन झालं. मात्र शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने हरभरा पिकवला असला तरी विक्रीसाठी त्यांची परवड होतेय. एक तर खरेदी लवकर केली जात नाही आणि झाली तरी किमान दोन महिने हातात पैसे पडत नाहीत त्यामुळे शेतकरी मेताकुटीला आलाय. अशातच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडच्या वतीने हमीभावावर हरभरा खरेदी सुरू आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून वाहनांच्या रांगा लागल्यात. आज तर ही रांग तब्बल 4 किमीपर्यंत गेल्याचं पहायला मिळतंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live