बुलेटला टक्कर देण्यासाठी 'हार्ले' सज्ज

बुलेटला टक्कर देण्यासाठी 'हार्ले' सज्ज

बायकर्ससाठी एक आनंदाची बातमी. BMW नंतर आता प्रीमियम क्लास मानली जाणारी हार्ले डेव्हिडसन सुद्धा भारतीय बाजारपेठेत पाय रोवण्यास तयार आहे.. लवकरच हार्ले डेव्हिडसनच्या  250 ते 500 CC च्या बाईक्स मुंबई पुण्याच्या रस्त्यांवर पाहायला मिळणार आहेत.

भारतीय बाजारपेठेतील बुलेटची वाढती मागणी पाहता आता परदेशी कंपनी हार्ले डेव्हिडसन ने सुद्धा भारतीय बाजारात पाय रोवण्याची जय्यत तयारी केलीये. बुलेटला टक्कर देण्यासाठी प्रीमियम क्लास ची हार्ले डेव्हिडसन आता 250 ते 500 CC च्या बाईक्स भारतीय बाजारपेठेत आणण्याच्या तयारीत आहे.

ब्रिटीश कंपनी ट्रिम्फ आणि भारतीय कंपनी बजाज झालेल्या करारानंतर हार्ले डेव्हिडसनने भारतीय बाजारपेठेत 250 ते 500 CC च्या बाईक्स आणण्याचा निर्णय घेतलाय. हार्ले डेव्हिडसन भारतीय बाजारपेठेत येत जरी असली तरी हार्ले कडून कोणत्या भारतीय कंपनीशी टाय-अप करून या बाईक्स भारतीय बाजारपेठेत येतील हे मात्र अद्यापही उघड करण्यात आलेलं नाही.  

WebLink : marathi news Harley devidson to compete with royal en field 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com