तूर घोटाळ्याप्रकरणी CID चौकशी व्हावी; माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मुंबईत समोर आलेला तूर घोटाळा अत्यंत गंभीर असून यात लवकरात लवकर CID चौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मागणी केलीये.   

मुंबईत समोर आलेला तूर घोटाळा अत्यंत गंभीर असून यात लवकरात लवकर CID चौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मागणी केलीये.   

राज्यातील विक्रमी तूर उत्पादनानंतर तूर खरेदी आणि भरडाईपासून सुरू झालेली गैरव्यवहारांची मालिका आता तूर विक्रीपर्यंत पोचली आहे. ३५ रुपये किलोने विक्री अपेक्षित असलेली शासकीय तूर पिशव्या फाडून खुल्या भावाने विकली जात असल्याचा संशय आहे.

शासकीय तुरीच्या रिकाम्या पिशव्यांचा ढीगच मुंबईत सापडला आहे. यामागे तूरडाळीचे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे पणन विभागातील अतिवरिष्ठ सूत्रांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

WebTitle : marathi news  harshawardhan patil demands cid enquiry in  toor scam in maharashtra 


संबंधित बातम्या

Saam TV Live