हर्षवर्धन पाटील अखेर भाजपात; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला भाजप प्रवेश 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

मुंबई : मी विनाअट भाजपमध्ये प्रवेश केला असून आजचा दिवस माझ्यासाठी ऐतिहासिक आहे. तसेच, मी इंदापूरच्या जनतेच्या वतीने मी भाजपात प्रवेश केला असल्याचे मत आज (ता.11) भारतीय जनता पक्षात प्रवेस केल्यावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. 

दुष्काळ, पूरपरिस्थितीत सरकारने मदत केली. आमचा समाज अन्यायग्रस्त आहे, तुम्ही हा अन्याय दूर कराल ही अपेक्षा असल्याचे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. 1952 पासून एका विचारात वाढलेली आमची चौथी पिढी, राजकारण, समाजकारण, तत्व, निष्ठा कधीच सोडली नाही.

आमचं आणि तुमचं व्यासपीठ ठरलेलं होतं, कलम 370, मोटार व्हेईकल कायदा, अशा अनेक धाडसी निर्णयामुळे आम्ही आपल्यासोबत एकत्र येण्याचा निर्णय घेतला असल्याचेहही हर्षवर्धन पाटील म्हणाले.

लोकशाहीतील डायलॉग चालू राहिला पाहिजे, मी कोणतीही अट घरून भाजपात आलो नसल्याचे हर्षवर्धन यांनी यावेळी स्पष्ट केले. पाच वर्षात मी कधी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर ताण पाहिला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

संबंधित बातम्या

Saam TV Live