या चार नेत्यांकडे कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 3 जुलै 2019

मुंबई : बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी जवळपास निश्चित असून, हर्षवर्धऩ पाटील, के. सी. पाडवी, अमित देशमुख आणि नितीन राऊत यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई : बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी जवळपास निश्चित असून, हर्षवर्धऩ पाटील, के. सी. पाडवी, अमित देशमुख आणि नितीन राऊत यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे प्रमुख नेते वेणुगोपाल यांची नुकतीच भेट घेतली होती. दोन दिवसांआधी पावसाळी अधिवेशन सुरु असताना थोरातांना अचानक दिल्लीला बोलावल्यामुळे काँग्रेसजनांच्या भुवया उंचावल्या होत्या. शिवाय हे बोलावणे राहुल गांधी यांचे खास सहकारी वेणुगोपाल यांच्या पुढाकाराने आल्याने सर्वांना धक्काच बसला.

वेणुगोपाल लोकसभेत राहुल यांच्या शेजारी बसतात. अहमद पटेल यांनाही वरचढ झाले आहेत. खर्गे आणि वेणुगोपाल यांनी थोरातांची मुलाखत घेतली. दोन महिन्यात काय बदल घडू शकतात असे वेणूगोपाल यांनीच विचारले. संयमी स्वभावाच्या थोरातांनी जमेच्या चिंतेच्या बाजू समजावून सांगितल्या असे म्हणतात. राहुल यांच्या रुसव्यामुळे त्यांच्या खास मंडळींचे महत्व कमी होईल असे मानले जाईल पण तसे घडताना दिसत नाही, अशी खंत व्यक्त केली जाते आहे.

राहुल गांधी रा.स्व.संघावरील खटल्यासाठी उद्या (गुरुवार) भिवंडी न्यायालयात हजर रहाणार आहेत. पदे गेलेला अशोक चव्हाण गटाची नाराजी नको म्हणून नव्या पदाधिकाऱ्यांच्या घोषणा 5 तारखेला (शुक्रवारी) कराव्यात असा एक सूर आहे.

 

Web Title: Harshawardhan Patil, KC Padvi, Amit Deshmukh, Nitin Raut will be working presidents in congress


संबंधित बातम्या

Saam TV Live