हरियानामध्ये कॉंग्रेस प्रवाक्त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 जून 2019

चंदिगड : हरियानातील काँग्रेस प्रवक्ते विकास चौधरी यांची फरिदाबादमध्ये आज (गुरुवार) सकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 

आज सकाळी जिमहून परत येत असताना विकास चौधरी यांच्या मोटारीवर तोंड झाकून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. चौधरी यांच्यावर सेक्टर-9 मध्ये हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर 5-6 गोळ्या झाडल्या. चौधरी यांना सर्वोदय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

भरदिवसा झालेल्या हत्येमुळे फरिदाबादमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. सध्या पोलिसांकडून घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हींचे फुटेज तपासले जात आहे. हरियाना काँग्रेसचे प्रधेशाध्यक्ष अशोक तन्वर म्हणाले, की येथे कायद्याचा धाक कोणालाच राहिला नाही, हे जंगलराज झाले आहे. बुधवारीही महिलेच्याबाबतीत अशीच घटना घडली होती.

Web Title: Haryana Congress Leader Vikas Chaudhary Shot Dead in Faridabad

संबंधित बातम्या

Saam TV Live