तारक मेहता...' फेम कवी कुमार यांचे निधन

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 जुलै 2018

टी. व्ही. वर 'तारक मेहता का उलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून डॉ. हंसराज हाथी ही भूमिका साकारणारे अभिनेता कवी कुमार आझाद यांचे ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यांना मीरा रोड येथील वॉकहार्टस् हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.  

प्रेक्षकांना सतत हसत ठेवणारे कवी कुमार आझाद हे मुळचे बिहारचे रहिवासी होते. कवी कुमार हे त्यांच्या वाढत्या वजनाने त्रस्त होते. 2010 साली त्यांनी शस्त्रक्रिया करुन ऐंशी किलो वजन कमी केले होते. मालिकांबरोबरच आमीर खानचा 'मेला' आणि 'फंटूश' या सिनेमातही त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांच्या या अचानक जाण्यामुळे 'तारक मेहता का...' मालिकेचे शुटींग थांबविण्यात आले आहे. मालिकेला नुकतीच दहा वर्षे पुर्ण झाल्याच्या आनंदात मिटींगचे आयोजन करण्यात आले आहे. पण त्याआधीच कवी कुमार यांनी जगातून एक्झिट घेतली. 

संबंधित बातम्या

Saam TV Live