VIDEO | कोल्हापूरकरांचा नादच खुळा! अशी वरात कधी पाहिलीय का?

VIDEO | कोल्हापूरकरांचा नादच खुळा! अशी वरात कधी पाहिलीय का?

 लग्न म्हणजे खर्च... लग्न म्हणजे जल्लोष..अस चित्र डोळ्यासमोर येत.. मात्र लग्नाचा सामाजिक संदेश देण्यासाठी होऊ शकतो हे दाखवून दिलंय कोल्हापूरमधील एका कुटुंबान.. पाहु या  हे अनोखं लग्न...

अनेक जण लग्नाची वरात सजवलेल्या गाडीतून, पालखीतून काढतात. मात्र कोल्हापुरात एका लग्नाची वरात चक्क शेणाने सारवलेल्या गाडीतून काढण्यात आलीय. ही वरात सध्या चर्चेचा विषय ठरलीय.


अनेकजण लग्नात मुलीची विदाई फुलांनी सजवलेल्या पालखीतून करतात... लयतर हौशी मुलीचा बाप आपल्या लाडक्या मुलीची विदाई हेलिकॉप्टर मधून कारतो...पण कोल्हापूरात आज एका बापानं आपल्या लाडक्या मुलीची विदाई शेणाने लेप दिलेल्या कार मधून केलीय...ग्लोबल वार्मिंग लक्षात घेऊन शेणाचे महत्व किती आहे. हे पटवून देण्यासाठी आणि समाज प्रबोधन करण्यासाठी डॉ. नवनाथ दुधाळ यांनी  अशा प्रकारे गाडीची सजावट केलीय. शिवाय शेणामुळे मोबाईलच्या अँटी रेडिशन पासून बचाव होतो, असे डॉ. दुधाळ यांनी सांगितलंय. नवनाथ दुधाळ यांनी त्यांच्या लेकीची पाठवणी अशी अनोख्या पद्धतीने केलीय. शेणाने लेप दिलेल्या या गाडीची सजावट पाहून त्यांची मुलगीही भारावून गेली. दरम्यान शेणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी नवनाथ दुधाळ यांनी ही अनोखी शक्कल लढवलीय.

वडिलांनी केलेले गाडीची सजावट पाहून नवरी निकिता देखील तितकीच खुश आहे. माझं लग्न हे एक निम्मित आहे, पण त्यांनी त्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय.
बदलत्या काळात डॉ. नवनाथ दुधाळ यांनी शेणाने सजवलेल्या कारमधून आपल्या मुलीची विदाई करतात,याचं कौतुक नवऱ्याकडील मंडळींनी देखील केलंय. तापमान वाढीत शेणाचे महत्व पटवून देण्याचा छोटासा प्रयत्न डॉ. दुधाळ यांनी आपल्या मुलीच्या लग्नातून दिलाय.

Web Title - Have you ever seen such a wedding?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com