‘त्यांनी’आत्महत्येस हे जबाबदार म्हणत...घेतला गळफास!

‘त्यांनी’आत्महत्येस हे जबाबदार म्हणत...घेतला गळफास!

ठाणे : राज्यात सर्वत्र सामूहिक आत्महत्येच्या घटना घडत असतानाच डोंबिवली शहरानजीक असलेल्या वाकळण गावही आज अशाच एका घटनेने हादरून गेले. सोमवारी (ता. २) वाकळण गावातील पाटील दाम्पत्याने आपल्या लहान मुलीसह गळफास लावून आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. पती शिवराम रामा पाटील, पत्नी दीपिका पाटील आणि पाच वर्षांची मुलगी अनुष्का पाटील अशी मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. दरम्यान, जमिनीच्या वादातूनच आत्महत्या झाल्याचा आरोप पत्नीच्या माहेरकडील नातेवाईकांनी केला आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी शिवराम आणि दीपिका यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ‘घरातील कुटुंबीयांचा आपल्याला त्रास होत आहे. आमच्या तिघांच्या आत्महत्येस घरातील सर्व जबाबदार आहेत,’ असा उल्लेख करून चिठ्ठीत १३ कुटुंबीयांची नावे नमूद करण्यात आली आहेत. पत्नीने ही चिठ्ठी माहेरकडील मंडळींना व्हॉट्‌सॲपवर पाठवून १३ दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. या घटनेमुळे गावात सोमवारी तणावाचे वातावरण होते; मात्र पाटील कुटुंबीयांना नेमका कोणता त्रास होता याबाबतची अधिकृत आणि ठोस माहिती देण्याचे पोलिसांनी टाळले. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.  दरम्यान, घटनेची माहिती मिळताच दीपिका यांच्या माहेरकडील स्थानिक नगरसेविका प्रमिला पाटील यांनी डायघर पोलिस ठाण्यात धाव घेत दोषींवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. 

जमिनीचा वाद? 
जमिनीच्या वादातूनच आत्महत्येचा प्रकार घडल्याचा आरोप मुलीचे नातेवाईक सुषमा पाटील यांनी केला आहे. वर्षभरापासून त्यांना त्रास दिला जात होता. पाटील कुटुंबीयांना घरदेखील बांधायचे होते, असे सुषमा यांनी सांगितले.

Web Title: marathi news he calls suicide a liability.... 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com