VIDEO | भर रस्त्यात त्याला उतरवावी लागली पँट आणि...

संभाजी थोरात
सोमवार, 16 डिसेंबर 2019

एक आंदोलक दादा इतका उत्साहात होता की पेटलेल्या पुतळ्याला लाथ मारताना त्याच्या पँटलाच आग लागली. त्याबात वाचा नाट्यमय आणि मजेशीर लिहीलेला हा खास रिपोर्ट...

कोल्हापुरात एक आंदोलन झालं. आंदोलन होतं राजकीय नेत्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या दहनाचं..मात्र, एक आंदोलक दादा इतका उत्साहात होता की पेटलेल्या पुतळ्याला लाथ मारताना त्याच्या पँटलाच आग लागली. त्याबात वाचा नाट्यमय आणि मजेशीर लिहीलेला हा खास रिपोर्ट...

 

ए दादा.. आंदोलन करतोयस खरा..पण जरा आवर स्वतःला..इतका उत्साह बरा नव्हे...आता हा पुतळा पेटवायला निघालायस..पण या बाटलीतल्या रॉकेलचे दोन-चार थेंब अंगावर उडले तर काय होईल, याचा विचार केलायस का...

अरे अरे अरे..बघ आम्ही बोलत होतो तेच झालं ना... पुतळ्याला आग लावलीस आणि लाथ मारायला गेलास...पेटली ना तुझीच पँट..आता बस ओरडत...

तू एकटाच नाहीस.. तुझ्यासारखे अनेक आंदोलक, साहेबांनी सांगितलं की आंदोलन करायला धावतात...आपणच कसे कट्टर हे दाखवायच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालून आंदोलन करतात आणि तुझ्यासारखी गत करून घेतात..
बघ, या आंदोलनाच्या नादात तुला तुझी पँट भर रस्त्यात उतरवावी लागली..अशा आंदोलनात अनेकांनी आपले प्राण गमावलेत....तेव्हा मित्रांनो आंदोलन करताना जरा जपून..तुमचे हेतू नेक असले तरी जीवही महत्त्वाचा आहे...

Web title - He had to Remove his the pant on road and..


संबंधित बातम्या

Saam TV Live