चोराला पकडण्याच्या प्रयत्नात लोकल मधून उडी घेऊन प्रवाश्याचा मृत्यू ((VIDEO))

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 जुलै 2019

मुंबई : हातातून मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला पकडण्याच्या नादात रेल्वेखाली येऊन एका तरुणाला आपला जीव गमावल्याचा धक्कादायक प्रकार चर्नीरोड रेल्वे स्थानकात काल (ता. 8) रात्री उशिरा घडला.

चर्नीरोड रेल्वे स्थानकात ट्रेनमधून उतरताना मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव शकील अब्दुल गफार शेख असे आहे. मोबाईल चोरांचा पाठलाग करण्यासाठी गेलेल्या या प्रवाशाचा लोकलखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून ही घटना रात्री उशिरा घडली.

शकील अब्दुल गफार शेख हे ताज येथे कामाला होते. काही दिवसांपूर्वीच घरातील मोठ्या मुलाची नोकरी सुटल्याने संपुर्ण शेख कुटुंब तणावाखाली होते. यातच घरातील कमावता पुरुष गेल्यामुळे शेख परिवारावर दोन्ही बाजूने दुखःचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी आरोपी अद्याप मोकाट असून चर्चगेट रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Web Title: He lost his life in an attempt to catch a mobile thief

संबंधित बातम्या

Saam TV Live