मोदी खूप चांगलं इंग्लिश बोलतात पण आता त्यांना बोलायचं नाही – डोनाल्ड ट्रम्प

मोदी खूप चांगलं इंग्लिश बोलतात पण आता त्यांना बोलायचं नाही – डोनाल्ड ट्रम्प

संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांमधील सख्य, मैत्रीचे एक वेगळे रुप पाहायला मिळाले. फ्रान्समधील जी ७ परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्परांची भेट घेऊन वेगवेगळया मुद्यांवर चर्चा केली. यावेळी  दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली यासंबंधीच्या एका प्रश्नावर नरेंद्र मोदी यांनी “आम्हाला दोघांना चर्चा करु द्या जेव्हा आवश्यक वाटेल तेव्हा तुम्हाला सांगू” असे उत्तर दिले. तितक्यात ट्रम्प यांनी “मोदी खूप चांगलं इंग्लिश बोलतात पण त्यांना आता इंग्लिश बोलायचं नाही” असं म्हणाले. त्यावर दोन्ही नेत्यांना आपले हसू आवरता आले नाही. दोघांनी परस्परांचे हात हातात घेतले. 

मोदींनी आपल्या नेहमीच्या शैलीत हातावर टाळी देखील दिली. मोदी आणि ट्रम्प दोघेही आपल्या देशाच्या राष्ट्रीय हिताला प्रथम प्राधान्य देणारे म्हणून ओळखले जातात. या निमित्ताने जगाला त्यांच्या मैत्रीच एक वेगळ रुप पाहायला मिळालं.

काश्मीरसह सर्व विषय भारत-पाकिस्तानमधले दि्वपक्षीय मुद्दे आहेत. आम्हाला तिसऱ्या देशाला त्रास द्यायचा नाही असे मोदी यांनी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प काश्मीर मुद्दावर मध्यस्थी करण्याची वारंवार तयारी दाखवत होते. पण आता त्यांनी माघार घेतली आहे. भारत आणि पाकिस्तान त्यांचे मतभेद सोडवतील असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
मोदींनी यावेळी ट्रम्प यांच्यासमोर काश्मीर हा भारत-पाकिस्तानमधला द्विपक्षीय मुद्दा असल्याचे सांगितले. दोन्ही देश आपसातील मतभेद सोडवतील असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला. 

काश्मीर प्रश्नी अमेरिकेने मध्यस्थी करावी यासाठी पाकिस्तानचा आटापिटा सुरु आहे. पण ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दावर आज जी भूमिका मांडली तो एकप्रकारे भारताचा राजनैतिक विजय आहे. काश्मीर मुद्दावर काल रात्री आम्ही बोललो. काश्मीरमधली परिस्थिती नियंत्रणात असल्याचे मोदींचे मत आहे. ते पाकिस्तान बरोबर चर्चा करुन नक्कीचे काही तरी चांगले घडवून आणतील असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.

Web Title: He Speaks Very Good English Donald Trump Pm Modi

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com