औरंगाबादमध्ये शाळेत घुसून मुख्याध्यापकाला अज्ञात व्यक्तीकडून मारहाण

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 31 जुलै 2019

औरंगाबाद - मुख्याध्यापिकेसह शिक्षकाला मारहाणीची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता.30) प्राईम स्टार इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शेख झिया यांना अज्ञात व्यक्तीने शाळेत येऊन मारहाण केली. 

औरंगाबाद - मुख्याध्यापिकेसह शिक्षकाला मारहाणीची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता.30) प्राईम स्टार इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शेख झिया यांना अज्ञात व्यक्तीने शाळेत येऊन मारहाण केली. 

शाळेत घुसून मुख्याध्यापक व इतर कर्मचाऱ्यावर गंभीर स्वरूपाचे हल्ले होत आहेत. मागील आठवड्यात शाळेतील इयत्ता नववीच्या मुलींच्या वादावरून शिवाजीनगर येथील कलावती चव्हाण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संध्या काळकर यांच्यावर पालकांनी शाळेत येऊन हल्ला केला होता. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता.30) सकाळी नऊ वाजता कटकट गेट येथील प्राईम स्टार इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक शेख झिया व लिपिकास एका अज्ञात व्यक्तीने मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या घटनेचा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएनशनतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे.  दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या (मेसा) रत्नाकर फाळके, प्रवीण आव्हाळे, प्रल्हाद शिंदे, उमेश अहिरराव यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. 
 

संस्थाचालक व शाळेतील शिक्षकासोबत एका व्यक्तीची झटापट, मारहाण झाली. त्यात मारहाण करणाराही जखमी झाला असून, त्याच्यावर घाटीत उपचार करण्यात आले. मारहाण करणाऱ्याचा मुलगा या शाळेत नाही, तरीही वादातून हा प्रकार घडला. शाळा व्यवस्थापनाच्या तक्रारीनुसार या प्रकरणात गुन्हा नोंद करीत आहोत.'' 
- व्ही. एम. केंद्रे, पोलिस निरीक्षक, जिन्सी ठाणे. 

Web Title: Head master's beaten at school


संबंधित बातम्या

Saam TV Live