VIDEO | पुण्यात नोकरी, शिक्षणासाठी आलेली लेकरं जेवणार कुठं?

साम टीव्ही
बुधवार, 18 मार्च 2020

आता बातमी कोरोनामुळे निर्माण झालेल्या पोटाच्या प्रश्नाची. पुण्यात नोकरी,आणि शिक्षणासाठी आलेल्यांच्या जेवणाचा गंभीर प्रश्न उभा राहिलाय.

कोरोनाच्या साथीने डोकं वर काढल्यानंतर प्रत्येकाच्या जगण्यावर बंधनं आलीयत. त्यातच आता बाहेरगावाहून पुण्यात येऊन राहणाऱ्या नोकरदार आणि विद्यार्थ्यांसमोर पोटाचा प्रश्न उभा राहिलाय. कारण पुण्यातलली हॉटेल्स आधीच बंद आहेत आणि आता पुण्यातील मेसही बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

कोरोनाचं वादळ आल्यापासून अनेकजण आपापल्या गावी निघून गेलेत. मात्र ज्यांना ते शक्य झालेलं नाहीय त्यांच्या पोटाची आबाळ होण्याची शक्यता निर्माण झालीय. खिशात पैसे आहेत पण जेवायचं कुठं असा प्रश्न या पुण्यातील लेकरांपुढे आ वासून उभाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live