बदलत्या हवामानाची डोकेदुखी; तापमानातील चढउतारामुळे पुणेकर हैराण

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 मार्च 2020

पुणे - रात्री गारठा, पहाटे थंडी, तर दुपारी उन्हाचा चटका असे हवामान सध्या शहरात आहे. कमाल आणि किमान तापमानातील तफावतदेखील वाढत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदले आहे. गेल्या आठ दिवसांमधील सातत्याने बदलणाऱ्या हवामानाचा थेट फटका पुणेकरांच्या आरोग्याला बसत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. 

पुणे - रात्री गारठा, पहाटे थंडी, तर दुपारी उन्हाचा चटका असे हवामान सध्या शहरात आहे. कमाल आणि किमान तापमानातील तफावतदेखील वाढत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदले आहे. गेल्या आठ दिवसांमधील सातत्याने बदलणाऱ्या हवामानाचा थेट फटका पुणेकरांच्या आरोग्याला बसत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. 

पुण्यात २६ फेब्रुवारीला कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २.५ अंश सेल्सिअने कमी होऊन ३०.८ अंश सेल्सिअस नोंदला गेला. त्यानंतर अवघ्या चोवीस तासांमध्ये पारा ३.३ अंश सेल्सिअसने उसळी मारून ३४.१ अंश सेल्सिअसवर पोचला. त्यानंतर पुढील तीन दिवस सातत्याने दिवसाचे तापमान कमी होत गेले. मंगळवारपर्यंत ते ३१.७ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले होते, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

उन्हाचा चटका वाढणार
पुढील दोन दिवसांमध्ये शहर आणि परिसरात आकाश निरभ्र राहणार असून, ३१ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झालेला कमाल तापमानाचा पारा ३४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाजही हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. 

विदर्भात वादळी पावसाचा अंदाज 
राज्यात उन्हाचा चटका वाढला असतानाच सातत्याने पावसाला पोषक हवामानही होत आहे. विदर्भात येत्या गुरुवारपासून (ता. ५) वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. राज्याचे कमाल आणि किमान तापमान कमी-जास्त होणार असल्याची शक्‍यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राज्यात ढगाळ हवामान होत असून, उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. किमान तापमान मात्र सातत्याने कमी अधिक होत आहे. राज्यात सर्वाधिक तापमान मालेगाव येथे ३६.६ अंश सेल्सिअस, तर नीचांकी तापमान नगर येथे १३.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. महाराष्ट्रात असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा मंगळवारी विरून गेला होता. 

लहान मुलांसह ज्येष्ठांना त्रास
सकाळी अचानक पडणारी थंडी आणि दिवसभर उन्हाचा चटका, अशा हवामानाच्या लहरीपणामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.  हवामानात वेगाने झालेल्या बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखीने पुणेकर त्रस्त झाले आहेत. त्याचा सगळ्यात मोठा फटका लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे, असे निरीक्षण कोलंबिया एशिया रुग्णालयाचे डॉ. वैभव पंधरकर यांनी नोंदविले. 

Web Title   The Headache Of The Changing Weather Is Due To Fluctuations In Temperature


संबंधित बातम्या

Saam TV Live