उघड्यावर ठेवलेल्या उसावर कुत्र्यांची लघुशंका; मधुर रसवंती बनली खारट

प्रसेनजीत इंगळे 
शनिवार, 15 जून 2019

कोणत्याही सिझनमध्ये उपलब्ध होणारा उसाचा रस आरोग्यवर्धक मानला जातो. उसाच्या रसाचा चाहतावर्गही खुप मोठा आहे. अनेक अर्थांनी बहुगुणी असलेला उसाचा रस कावीळीसारख्या आजारावर रामबाण उपाय मानला जातो. या फोटोत पाहा कशा प्रकारे हा भटके कुत्रा उघड्यावर ठेवलेल्या ऊसावर लघुशंका करतोय. 

नालासोपारा रेल्वे स्टेशनच्या पूर्व-पश्चिम भागात रस्त्यालगत ऊसाचे अनेक स्टॉल्स आहेत. त्यासाठी ऊसाची अशी रस्त्यावर साठवणूक केली जाते आणि याच उसावर भटके कुत्रे लघुशंका करतात. लोकांच्या आरोग्याशी असा राजरोसपणे खेळ सुरूंय. विशेष म्हणजे एफडीएचं याकडे सर्रास दुर्लक्ष होतंय. 

गेल्या काही दिवसात उघड्यावरच्या खाद्यपदार्थांचा मुद्दा सातत्यानं चर्चिला जातोय. वडापाव, समोशांपासून इडली पाणीपुरीपर्यंत खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून एफडीएकडून कोणतेही नियम पाळले जात नाहीत. ऊसाचा रस, लिंबू सरबत देखील त्याला अपवाद ठरलेली नाहीत. एव्हढं सगळं समोर दिसूनही एफडीएमार्फत या विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे आता दाद मागायची कुठे? हाच प्रश्न सामान्य नागरिकांना पडलाय. 

WebTitle : marathi news health dog pee on the lot of sugarcane  

संबंधित बातम्या

Saam TV Live