राज्यातील हॉट्सपॉट कमी होतायत, पॅनिक होऊ नका - आरोग्यमंत्री

राज्यातील हॉट्सपॉट कमी होतायत, पॅनिक होऊ नका - आरोग्यमंत्री

मुंबई : राज्यात कोरोनाचे पाचच हॉटस्पॉट असून फार पॅनिक होण्यासारखी स्थिती नाही. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. मुंबई, MMR रिजन, पुणे, नागपूर आणि मालेगाव हे 5 कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. हॉटस्पॉटची संख्या कमी होणं ही दिलासादायक बाब असल्याचं टोपेंनी सांगितलंय. 

महाराष्ट्रात सुरूवातीला कोरोनासाठी 14 हॉटस्पॉट होते. आता तेथे रुग्ण संख्या नाही. त्यामुळे त्याची संख्या कमी करत पाच वर आली आहे.

मुंबई महानगर परिसर, पुणे परिसर, नागपूर, नाशिक,असे हॉटस्पॉट असून मालेगाववर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 

राज्यात दररोज 13 टक्के लोक बरे होऊन घरी जात आहेत. हे आशादायी चित्र आहे. केवळ 1 टक्के रुग्ण अत्यवस्थ आहेत. 83 टक्के लोकांना लक्षणे नाही तर 17 टक्के लोकांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत असेही ते म्हणाले. 

महाराष्ट्रात सुरूवातीला कोरोनासाठी हॉटस्पॉट होते. आता तेथे रुग्ण संख्या नाही त्यामुळे त्याची संख्या कमी करत पाच वर आली आहे. मुंबई महानगर परिसर, पुणे परिसर, नागपूर, नाशिक,असे हॉटस्पॉट असून मालेगाववर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. 

कोरोनाशी लढताना आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे,चाचण्या केल्या जात आहेत,सर्वेक्षण होत आहे. आयसोलेशन आणि क्वारंटाईन केले जात आहे. राज्यात रुग्ण दुपटीचा दर 7 दिवसांवर गेलाय त्यामुळे राज्यातील चित्र आशादायी आहे. नागरीकांनी घाबरू नये असे आवाहनही टोपे यांनी केले आहे. 

मंबईत संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याचे काम आजपासून सुरू करण्यात येणार आहे. कमी जागे मुळे होम क्वारंटाईन शास्त्रीय पद्धतीने होत नाही,अशा वेळी दाट वस्त्यांमधील नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल. त्यासाठी शाळांमध्ये खाटा टाकून तशी व्यवस्था केली जाईल.

प्लाझ्मा थेरपीनुसार मुंबईत उपचाराचा प्रयोग केला जाणार आहे. जे रुग्ण बरे झालेत त्यांचे रक्तद्राव घेऊन ते कोरोनाच्या गंभीर रुग्णांना देऊन त्यांच्यामध्ये ऍण्टीबॉडीज वाढविण्याचे काम करतील असेही त्यांनी सांगितले. 

कोरोना उपचारासाठी नवीन तंत्रज्ञान आणले जात आहे. पीपीई कीटची गरज भासू नये यासाठी फोटो बुथ सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे.राज्याचा कोरोनामुळे होणारा मृत्यूदर देखील 7 वरून सरासरी 5 वर आला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा अभ्यास करण्यासाठी 2 समित्या नेमल्या आहेत.  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com