अकोल्यात उष्णतेची लाट; पारा 46 च्या वर  

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

बाळापूर (अकोला) : तालुक्यातील वाडेगाव येथील विलास रमेश गोसावी (गीरी) (वय 32)  याचा अचानक मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 26) सकाळी सातच्या सुमारास घडली. 

वाढत्या तापमानामुळे उष्णतेची लाट आली असुन उच्चांक 46 च्या वर पोचला आहे. सर्वत्र नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून सूर्य आग ओकायला सुरुवात करतो ते संध्याकाळी सहाला थांबतो. या रखरखत्या उन्हाचा तडाखा मानवी जीवनाला बसला असून याचा बाळापूर तालुक्यात पहिला बळी गेला असल्याची शक्यता आहे. 

प्राप्त माहितीनुसार गीरी हा वाडेगाव परीसरात असलेल्या एका पेट्रोल पंपावर काम करतो. काल तो सासुरवाडीला व्याळा येथे गेला होता. त्याला रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागले व चक्कर येत असल्याने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे त्याची प्रकृती खालावली होती. सकाळी सात वाजता त्याचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू उष्माघाताने झाला किंवा अन्य काही कारणाने झाला, याची चौकशी सुरू असून विच्छेदनाच्या अहवालात ते स्पष्ट होणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी भावना हाडोळे यांनी सांगितले आहे.

Web Title : marathi news heat wave in akola temperature on forty fife 

संबंधित बातम्या

Saam TV Live