उन्हाच्या चटक्‍याने जिवाची काहिली

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

पुणे  - राज्यासह देशाचा बहुतांश भाग यंदाच्या उन्हाळ्यात उन्हाच्या चटक्‍यात होरपळून निघेल. कारण, मार्च ते मेदरम्यान तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदले जाईल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भ या राज्यातील चारही हवामान उपविभागांत उन्हाच्या झळा वाढतील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे भारतीय हवामान खाते दरवर्षी पावसाबरोबरच हिवाळा आणि उन्हाळ्याचाही अंदाज वर्तविते. ‘मॉन्सून मिशन कॅपल्ड फोर्कास्टिंग सिस्टीम’ (एमएमसीएफएस) हे प्रारूप विकसित केले आहे. त्यातून मार्च ते मेदरम्यान उन्हाळ्याचा हवामान खात्याने जाहीर केला.

देशात यंदाचा उन्हाचा चांगलाच तापणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला. मार्च ते मे या दरम्यान कमाल आणि किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा जास्त नोंदला जाणार आहे. वायव्य, पश्‍चिम आणि मध्य भारत, तसेच दक्षिण भारतातील काही हवामान उपविभागांत यंदा उन्हाचा चटका सर्वाधिक असेल. 

राजस्थानमध्ये या वर्षीही यंदाच्या पश्‍चिम राजस्थानमध्ये कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा जास्त उसळी मारेल. 

विदर्भ दरवर्षी उन्हाच्या चटक्‍यात भाजून निघतो. उत्तर महाराष्ट्रातही कमाल तापमान चाळिशीच्या पुढे जाते. या वर्षीच्या उन्हाळ्यातदेखील या प्रदेशातील कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदले जाणार असून, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांत उन्हाची तीव्रता जाणवेल, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. 

सूर्याची प्रखर किरणे थेट जमिनीवर पडल्याने दिवसाच्या तापमान वाढ होण्याची शक्‍यता वर्तवत असतानाच रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा जास्त नोंदले जाईल, असा अंदाज दिला. 

उष्णतेची लाट
महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या हवामान उपविभागांबरोबरच देशात काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट निर्माण होते, असे खात्याने सांगितले. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात देशात मार्च ते मेदरम्यान येणाऱ्या उष्णतेच्या लाटेत कमाल तापमान सरासरीपेक्षा वाढण्याची शक्‍यता ४३ टक्के आहे.

Web Title Heat Wave In Maharashtra

संबंधित बातम्या

Saam TV Live