बदलापूर-वांगणी दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली; ट्रेनमध्ये 2000 प्रवासी अडकलेत

बदलापूर-वांगणी दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली; ट्रेनमध्ये 2000 प्रवासी अडकलेत

मुंबई : वांगणीजवळ अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफ, नौदल आणि पोलिसांची मदत घेण्यात येत आहे. 

बदलापूर-वांगणी दरम्यान गोरेगावजवळ महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली आहे. या गाडीत सातशे प्रवाशी अडकून पडले आहेत. गेल्या काही तासांपासून प्रवाशी अडकल्याने आणि रुळावर पाणी साचल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी NDRF, Navy, अग्निशमन दल, ठाणे, बदलापूर, स्थानिक गावकरी यांची मदत घेण्यात येत आहे.

मध्य रेल्वेनेही ट्विट करत रेल्वे पोलिस महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये असून, घाबरण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे. रुळाच्या दोन्ही बाजूला महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने गाडीत अडकलेल्या प्रवाशांमध्ये भीती वाढत आहे. कर्जत आणि वांगणी येथे ट्रॅकवर सचल्यामुळे रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच मुंबईहून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या कल्याण इथेपर्यंतच धावणार आहेत.

LIVE UPDATES 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com