मुसळधार पावसामुळे दादर परिसरातील शाळा सोडल्या..  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 जुलै 2018

सकाळपासून सुरु असलेल्या पावसानं दादरच्या हिंदमाता परिसरात सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील दादर परिसरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

हिंदमाता परिसरात पाणी साचल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतुकीचीही  कोंडी झाली आहे. पालिकेचे कर्मचारी हिंदमाता परिसरात पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न करतायेत. मात्र पावसाचा जोर मुंबईमध्ये कायम आहे.  

दिवसभर कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबई शहरात हिंदमाता, परळ टी.टी., गांधी मार्केट, सायन येथील मुख्याध्यापक भवन, सायन रोड क्रमांक २४, सायन येथील हेमंत मांजरेकर मार्ग, अँटॉप हिल येथे पाणी साचलंय.

पूर्व उपनगरात चेंबूर येथील शेल कॉलनी आणि पोस्टल कॉलनी, कुर्ला पश्चिमेकडील बैल बाजार आणि काळे रोड, एलबीएस मार्गावरील शीतल सिनेमा परिसरात पाणी साचलं.

संबंधित बातम्या

Saam TV Live