उल्हासनगरमध्ये जोरदार पाऊस; फर्निचर मार्केटमध्ये पाणीच पाणी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 जून 2019

उल्हासनगरमध्ये जोरदार पाऊस झालाय. फर्निचर मार्केटमध्ये पाणी शिरलंय. काल पासून सतत पडत असलेल्या पावसामुळे उल्हासनगर मधून दैना झाली.  फर्निचर मार्केट मध्ये येथील दुकानान मध्ये पाणी शिरलं असून ,येथील नाले ओथंबून वाहत असून ,उल्हासनगर महानगरपालिकेने नाले सफाईचे जे दावे केले होते ते फोल होताना दिसत आहे ,फर्निचर बाजारातील एका रस्त्यावर तर नदीच स्वरूप प्राप्त झालं.

दरम्यान, पुढील काही तासांत मुंबईसह उपनगरात जोरादार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईसह पालघर, भिवंडी, ठाणे, कल्याण, दादर, माहीम या भागांत पावसाने हजेरी लावली आहे. उपनगरातील कुर्ला, घाटकोपर, सकिनाका मालाड सबवे, अंधेरी, ठाणे येथील सखल भागात पाणी भरण्यास सुरवात झाली आहे. 

हिंदमाता, सायन परिसरात पाणी साचल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. मरोळ जंक्शन भवानीनगर येथे कारवर झाड कोसळले. सकाळ पासून कोसळणाऱ्या पावसाची कुलाबा 10 मीमी, पूर्व उपनगर 58 मीमी, पाश्चिम उपनगरात 28 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

WebTitle :marathi news heavy rain in mumbai ulhasnagar flooded with water

संबंधित बातम्या

Saam TV Live