नवी मुंबईत पाणीच पाणी!

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 जुलै 2019

नवी मुंबई - दोन दिवसांच्या अल्पशा विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा नवी मुंबईला चांगलेच झोडपून काढले. सकाळी साडेआठ वाजल्यापासून ते दुपारी साडेतीनपर्यंत शहरात सरासरी 95.07 मि.मी. पावसाची नोंद झाली. याच कालावधीत आलेल्या मोठ्या भरतीमुळे शहरातील अनेक ठिकाणे पाण्याखाली गेली. 

नवी मुंबई - दोन दिवसांच्या अल्पशा विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा नवी मुंबईला चांगलेच झोडपून काढले. सकाळी साडेआठ वाजल्यापासून ते दुपारी साडेतीनपर्यंत शहरात सरासरी 95.07 मि.मी. पावसाची नोंद झाली. याच कालावधीत आलेल्या मोठ्या भरतीमुळे शहरातील अनेक ठिकाणे पाण्याखाली गेली. 

रविवारी रात्रीपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती. सोमवारी सकाळपासून पावसाने शहर आणि परिसरात चांगलाच जोर धरल्याने, अनेक सखल भागात पाणी भरले. भरतीमुळे या साचलेल्या पाण्याचा निचरा होणे शक्‍य नसल्याने अनेक ठिकाणी नाल्याचे पाणी रस्त्यांवर आले होते. शहरात ऐरोली, तुर्भे पोलिस ठाणे, सानपाडा ते तुर्भे मार्ग, एमआयडीसी, वाशी रेल्वेस्थानक परिसर, सेक्‍टर-9, जुईनगर, शिरवणे, नेरूळ, बेलापूर, उरण फाटा असा सर्व परिसर जलमय झाला होता. या शहरातील वर्दळीच्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांची विशेषत- वृद्ध व विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली. अनेक ठिकाणी पाण्यातून मार्ग काढण्यासाठी स्थानिक नागरिक मदत करत होते. रेल्वे स्थानकांजवळील ऐरोली, कोपरखैरणे येथील भुयारी मार्गात पाणी तुंबल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली होती. पावसामुळे दोन ठिकणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत; मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

महामार्गांवर वाहतूक कोंडी 

ठाणे-बेलापूर मार्ग पाण्याखाली गेल्याने सकाळी येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. ऐरोली सर्कलवरही पाणी साचल्याने घणसोली ते माईंडस्पेसपर्यंत वाहतूक मंदावली होती. शीव-पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. नागरिकांबरोबरच वाहनांनाही गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत होती. दरम्यान, ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एमआयडीसी मार्गे जाण्याची विनंती करणारे मेसेज सोशल माध्यमांवर फॉरवर्ड केले जात होते. 

सकाळी आठपासून दुपारी साडेतीनपर्यंत झालेला पाऊस 
बेलापूर - 85.3 मि.मी. 
नेरूळ - 89.90 मि.मी. 
वाशी - 101.30 मि.मी. 
ऐरोली - 103.80 मि.मी. 

Web Title: heavy rain in Navi mumbai


संबंधित बातम्या

Saam TV Live