पावसामुळे नवी मुंबईतील पोलिसांची दैना; तुर्भे MIDC पोलीस ठाणे पाण्याखाली

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 जून 2019

नवी मुंबईत आज पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबलं नेहमीप्रमाणे यंदाही तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे देखील पाण्याखाली गेलं. पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरल्यामुळे या साचलेल्या पाण्यातच पोलिसांना आपलं काम करावं लागलं. शिवाय पावसाच्या पाण्यात तेथील साहित्य भिजू नये यासाठी त्याची उठाठेव देखील पोलिसांना करावी लागली. 

दरम्यान, पुढील काही तासांत मुंबईसह उपनगरात जोरादार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईसह पालघर, भिवंडी, ठाणे, कल्याण, दादर, माहीम या भागांत पावसाने हजेरी लावली आहे. उपनगरातील कुर्ला, घाटकोपर, सकिनाका मालाड सबवे, अंधेरी, ठाणे येथील सखल भागात पाणी भरण्यास सुरवात झाली आहे. 

हिंदमाता, सायन परिसरात पाणी साचल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. मरोळ जंक्शन भवानीनगर येथे कारवर झाड कोसळले. सकाळ पासून कोसळणाऱ्या पावसाची कुलाबा 10 मीमी, पूर्व उपनगर 58 मीमी, पाश्चिम उपनगरात 28 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live