येत्या 26 जुलैला मुंबईत पुन्हा अतिवृष्टी; हवामान खात्याची माहिती 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 जुलै 2019

मुंबईत सर्वात मोठी जीवितहानी करणारा पाऊस 26 जुलै 2005 ला मुंबईकरांनी अनुभवलाय. तशीच काहीशी परिस्थिती येत्या 26 जुलैला पुन्हा निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जातेय.

कारण येत्या २६ जुलैला मुंबईत अतिवृष्टी होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. याशिवाय कोकण, गोवा तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. 

केरळच्या किनारपट्टीवर सक्रिय झालेला पाऊस आता कोकण आणि मुंबईमध्ये पुन्हा मुसळधार कोसळण्याची शक्यता आहे. स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेकडून 25,26,27 आणि 28 या चार दिवसात दमदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

26 जुलै 2005 ला मुसळधार पावसामुळे एक हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता, तर 14 हजार घरं उद्ध्वस्त झाली होती..यावेळी कधीही न थांबणाऱ्या मुंबईचे रस्ते ठप्प झाले होते. तर लाईफलाईन असणारी लोकल रेल्वेही बंद पडली होती.

WebTitle : marathi news heavy to very heavy rainfall expected on 26 july in mumbai by IMD

संबंधित बातम्या

Saam TV Live