बीएसएफच्या जखमी जवानाचं अपहरण.. गळा चिरुन हत्या

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

पाकिस्तानी रेंजर्सच्या क्रौर्य पुन्हा एकदा समोर आलं आहे. बीएसएफच्या जखमी जवानाचं अपहरण करुन गळा चिरुन हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सीमाभागत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेड कॉन्स्टेबल नरेंद्रसिंह असे जवानाचे नाव असून त्यांना तीन गोळ्या लागल्याचेही तपासात आढळून आले आहे. पाकिस्तानी रेंजर्सच्या या कृत्याचा भारताने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. रामगड सेक्टरमध्ये मंगळवारी बीएसएफचे जवान सीमेलगत गवत कापत असताना, पाकिस्तानी रेंजर्सनी या जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि ते सुरक्षित ठिकाणी पोहोचले.

मात्र, हेड कॉन्स्टेबल नरेंद्रसिंह मागेच राहिले. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली असता, नरेंद्रसिंह यांचा मृतदेह जवानांना सापडला.

WebTitle : marathi news height of inhumanity by pakistani toops slits BSF jawans throat 

संबंधित बातम्या

Saam TV Live