VIDEO | महिला हेल्पलाईन ठरतायत हेल्पलेस

VIDEO | महिला हेल्पलाईन ठरतायत हेल्पलेस

संकटात सापडलेल्या महिलांसाठी हेल्पलाईन तयार करण्यात  आल्यात..मात्र, आता सोशल मीडियात वेगवेगळ्या क्रमांकाच्या नावानं हेल्पलाईनचा सुळसुळाट झालाय आणि या हेल्पलाईन महिलांसाठी हेल्पलेस तर ठरत आहेतच, पण त्यांच्या संकटातही भर घालू शकतात..संकटकाळात महिलांना तातडीनं मदत मिळावी यासाठी हेल्पलाईन आहेत..मात्र, काही समाजकंटकांनी खोटे, बंद झालेले क्रमांक व्हायरल केल्यामुळे  संकटात सापडलेल्या महिलेची अवस्था बिकट होऊ शकते.. दिशा प्रकरणानंतर तर असे अनेक क्रमांक सोशल मीडियातून व्हायरल होतायत...अनेक नागरिक चक्क वैयक्तिक कारणांसाठीही 1091 या क्रमांकावर फोन करत असल्यानं हा क्रमांक बिझी राहतो आणि गरजूंना मदत मिळत नाही. नागपूर पोलिसांनी 1091 सह 9823300100 हा नंबर सक्रिय केलाय..रात्री नऊनंतर एखाद्या मुलीला किंवा महिलेला घरी जाण्यास वाहन नसल्यास ही महिला या क्रमांकावर फोन करू शकते..महिला पोलिस सरकारी वाहनातून या महिलेला किंवा मुलीला  घरी सोडतील.

महिलांना आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाईन अत्यंत मदतीच्या ठरू शकतात..मात्र, त्यांची दिशाभूल करणारे क्रमांक व्हायरल झाल्यास हे क्रमांकच त्यांच्या संकटात भर घालू शकतात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com