Loksabha 2019 : माझ्या शापामुळेच हेमंत करकरेंचा सर्वनाश - साध्वी प्रज्ञा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

भोपाळ : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले हेमंत करकरेंना मी शाप दिला होता. माझ्या शापामुळेच त्यांचा सर्वनाश झाला, असे मालेगाव स्फोटातली आरोपी आणि भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हटले आहे.

भोपाळ : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले हेमंत करकरेंना मी शाप दिला होता. माझ्या शापामुळेच त्यांचा सर्वनाश झाला, असे मालेगाव स्फोटातली आरोपी आणि भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हटले आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह म्हणाल्या, 'मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात माझ्याविरोधात पुरावे नसतानाही हेमंत करकरेंनी हेतुपूरस्कपणे कारवाई केली. मी म्हटले होते की, तुझा सर्वनाश होणार, बरोबर सव्वा महिन्यांनी सुतक लागले. ज्या दिवशी मी आत गेले त्यावेळी सुतक लागले. आणि बरोबर सव्वा महिन्यानंतर ज्या दिवशी दहशतवाद्यांनी त्याला (हेमंत करकरे) मारले, त्या दिवशी सुतक संपले.'

 

 

 

 

 

 

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला बुधवारी (ता. 17) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर लगेच त्यांना भोपाळमधून काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपने उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीवरुन राजकीय चर्चाही रंगली आहे. मात्र, 'हिंदू दहशतवाद' सारखे शब्द जन्माला घालणाऱ्या दिग्विजय सिंह यांच्याविरोधात साध्वीची उमेदवारी योग्यच असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. त्यामुळे भाजपकडून याबाबत काय स्पष्टीकरण दिले जाते, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Web Title: Marathi News Hemant Karkare treated me badly Sadhvi Pragya singh controversial statement at bhopal


संबंधित बातम्या

Saam TV Live