केरळ महापुरात अनेकांचा जीव वाचवणाऱ्या जिनेशचा दुर्दैवी मृत्यू...

केरळ महापुरात अनेकांचा जीव वाचवणाऱ्या जिनेशचा दुर्दैवी मृत्यू...

तिरूअनंतपुरम : केरळातील मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच अनेकांचा यामध्ये मृत्यू झाला. या पुरामध्ये अडकलेल्या अनेकांना वाचवणाऱ्या 'धाडसी' तरुणाचा अपघात झाला. अपघातानंतर त्याने मदतीसाठी खूप याचना केली. मात्र, त्याच्या मदतीसाठी कोणीही आले नाही. अखेर त्याचा उपचारांअभावी मृत्यू झाला. 

केरळमधील आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेकजण बेघर झाले तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. यातील बाधितांच्या बचावासाठी देशभरातून 'मदतीचा हात' देण्यात येत आहे. असे असताना येथील रहिवासी असलेल्या 24 वर्षीय जिनेश जेरोनने आपला जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी जिनेश आपल्या दुचाकीवरून जात असता त्याला भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यावेळी त्याने मदतीसाठी याचना केली. मात्र, त्याच्या मदतीसाठी कोणीही आले नाही. परिणामी उपचारांअभावी त्याचा मृत्यू झाला. 

जिनेशच्या अपघाताची माहिती त्याच्या दुचाकीच्या मागे बसलेल्या त्याचा मित्र जगनने दिली. जगन म्हणाला, ''जेव्हा दुचाकीला ट्रकने धडक दिली. तेव्हा मी एका ठिकाणी फेकला गेलो. जिनेश ट्रक खाली आला आणि त्याला ट्रकने चिरडले. या अपघातानंतर जिनेश मदतीसाठी याचना करत होता. मात्र, त्याच्या मदतीसाठी कोणीही आले नाही. या घटनेच्या अर्ध्या तासानंतर रुग्णवाहिका आली. मात्र, त्यापूर्वीच तो मृत झाल्याचे सांगण्यात आले''. 

दरम्यान, केरळच्या पुरात अनेकांचे जीव वाचविणाऱ्या जिनेशच्या मदतीसाठी कोणीही आले नसल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

WebTitle : marathi news hero of kerala jinesh who saved people from kerala flood died in accident  

 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com