'या' वयोगटातील नागरिकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका...

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 मार्च 2020

मुंबई - जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजलाय. चीनच्या वूहान प्रांतातून हा महाभयंकर व्हायरस पसरल्याचं बोललं जातं. अशात कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी लस तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. यावर अनेक भारतीय डॉक्टर्स देखील मोठ्या प्रमाणावर काम करतायत. मात्र यामध्ये अजून हवं तितकं यश मिळालेलं नाही. कोरोनाच्या विषाणूबद्दल दररोज नवनवे शोष लागतायत. कोरोनाबद्दलची अशीच एक महत्त्वाची माहिती आता समोर येतेय. मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचा मोठा फटका आपल्या वडीलधाऱ्यांना बसतोय अशी ही माहिती आहे.

मुंबई - जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजलाय. चीनच्या वूहान प्रांतातून हा महाभयंकर व्हायरस पसरल्याचं बोललं जातं. अशात कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी लस तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. यावर अनेक भारतीय डॉक्टर्स देखील मोठ्या प्रमाणावर काम करतायत. मात्र यामध्ये अजून हवं तितकं यश मिळालेलं नाही. कोरोनाच्या विषाणूबद्दल दररोज नवनवे शोष लागतायत. कोरोनाबद्दलची अशीच एक महत्त्वाची माहिती आता समोर येतेय. मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचा मोठा फटका आपल्या वडीलधाऱ्यांना बसतोय अशी ही माहिती आहे. वय वर्ष ६० आणि अधिकच्या वयोगटातील नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसल्याचं एका अहवालातून समोर आलंय. 

कोरोना संदर्भात World Health Organisation (WHO) ने एक पाहणी केली. यामध्ये कोरोनामुळे कोणत्या वयोगटातील नागरिकांना या व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे, याबाबत अध्ययन करण्यात आलं. यातील निष्कर्षानुसार जगभरातील ६१ देशातील तब्ब्ल ८६ हजार लोकांना कोरोनाची लागण झालीये. चीनमध्ये एकूण ४४ हजार ७०० नागरिकांना याची लागण झालीये. यातील ८० टक्के लोक ६० पेक्षा अधिक वयोगटातील आहेत. बाकीच्या देशातील वयोगटाबद्दलची आकडेवारी पहिली तर ही आकडेवारी देखील चीनसोबत मिळतीजुळती आहे.  

कोरोनामुळे मानवी शरीरातील फुफुसांवर थेट हल्ला चढवला जातो. ज्यामुळे लहान मुलांना याचा संसर्ग होण्याची शक्यता सर्वाधिक असू शकते. मात्र धक्कादायक बाब म्हणजे १० ते १९ वयोगटातील मुलांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचं प्रमाण केवळ १ टक्का आहे. दहापेक्षा कमी वयोगटातील मुलांमध्ये हे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी आहे. करोनामुळे एकही लहान मूल बळी पडलेलं नाही. चीनच्या 'सीडीसी विकली'मध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. 

Web Title:marathi news the highest risk of corona virus is to this age group....


संबंधित बातम्या

Saam TV Live