हिमाचलच्या 8 जिल्ह्यांमध्ये जलप्रलय ; केरळ, ओडिशानंतर हिमाचलमध्ये हाहाकार 

हिमाचलच्या 8 जिल्ह्यांमध्ये जलप्रलय ; केरळ, ओडिशानंतर हिमाचलमध्ये हाहाकार 

हिमाचल प्रदेशात पूरस्थिती गंभीर झालीय. हिमाचलच्या बियास नदीसह अनेक नद्यांना पूर आलाय. पूरस्थितीमुळं हिमाचलच्या 8 जिल्ह्यातलं जनजिवन विस्कळीत झालंय. मंडी जिल्ह्यात नदीच्या प्रवाहात खासगी ट्रॅव्हल्स वाहून गेलीय. तर अनेक ट्रकही कागदी होड्यांसारख्या जाताना दिसत होत्या. मनालीत एक कार पाच प्रवाशांसह वाहून गेलीय. अनेक रस्ते पाण्यात वाहून गेलेत.  इथल्या प्रशासनानं स्वतःला बचावकार्यात झोकून दिलंय. अनेक ठिकाणी मतदकार्यात लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत घेतली जातेय.     

धरणंही ओव्हरफ्लो झालीयेत. पूरस्थिती पाहून अनेक हायवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. गेल्या महिन्यात केरळ, त्यानंतर ओडिशा आणि आता हिमाचलमध्ये महाप्रलय आलाय. या महाप्रलयातून सर्व नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचं अग्निपरीक्षा प्रशासनाला द्यावी लागेल.

Youtube Link : https://youtu.be/uKVPGfG1f-4

WebTitle : marathi news himachal himachal pradesh heavy flood in valley routine on halt  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com