हिमाचलमध्ये स्कूल बस शंभर मीटर खोल दरीत कोसळून २९ विद्यार्थी ठार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 एप्रिल 2018

हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातल्या नुरपूर परिसरात स्कूल बस शंभर मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत २९ विद्यार्थी ठार झालेयत. एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य सुरु केलं. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय. तसंच या दुर्घटनेची  न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणाही करण्यात आलीय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live