हिंदू महासभेच्या माजी अध्यक्षाची गोळ्या घालून हत्या!

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

लखनऊ : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची आज (ता.18) सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना लखनऊमध्ये घडली. यामुळे शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून संपूर्ण लखनऊमधील बाजारपेठा आणि दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तिवारी हे हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष होते.

कमलेश तिवारी यांच्या लखनऊमधील नाका भागातील कार्यालयात भगवे कपडे घातलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला. तिवारींशी चर्चा केली, सोबत चहाही घेतला. त्यानंतर मिठाईच्या डब्यातून आणलेल्या चाकूने वार करून तसेच त्यांच्यावर गोळीबार करून तेथून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या तिवारींना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

डिसेंबर 2015 मध्ये मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कमलेश तिवारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच काही दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत तिवारींवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यात यावा, असे आदेश दिले होते. 

दरम्यान, कमलेश तिवारी यांचा नोकर अर्धा तास 100 नंबर डायल करत होता. मात्र, त्याचा कोणाशी संपर्क होऊ शकला नाही. घटना घडल्यानंतर अर्धा तास उलटून गेल्यावर पोलिस पोहोचले, अशी माहिती तिवारी यांच्या नोकराने दिली.

Web Title: Hindu Mahasabha leader Kamlesh Tiwari dead after being shot at in his office
 
संबंधित बातम्या

Saam TV Live