हे आहेत हिंदू कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्‍याम मानव, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची कन्या मुक्ता, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि रेडिओ जॉकी ऋतू राज हे नालासोपारा शस्त्रसाठाप्रकरणी अटकेत असलेल्या संशयितांच्या हिटलिस्टवर होते, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संशयितांची कसून चौकशी केली असता त्यातून ही माहिती उघड झाली. "एटीएस'ने विशेष न्यायालयास ही माहिती दिली. या पथकाने या संदर्भातील डायरीही या वेळी सादर केली. 

नालासोपारा शस्त्रसाठाप्रकरणी अटकेत असलेल्या अविनाश पवार (वय 30) या आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर करून त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी "एटीएस'च्या पथकाने केली होती. त्या वेळी आतापर्यंतच्या तपासात काय उघड झाले, अशी विचारणा न्यायालयाने केली असता, या पथकाने उपरोक्त माहिती दिली. 

या प्रकरणातील अन्य आरोपी वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगारकर यांच्या चौकशीत पवारचे नाव पुढे आल्याने "एटीएस'च्या पथकाने 24 ऑगस्टला पवारला माझगाव डॉक येथून अटक केली होती. वरील चार जणांच्या हत्येचा कट रचण्यासाठी आरोपींच्या प्राथमिक बैठकाही झाल्या होत्या. त्यांनी या कामासाठी शस्त्र आणि आर्थिक मदत कोठून घ्यायची, याबाबतही त्यांच्यात चर्चा झाल्याचा दावा "एटीएस'ने न्यायालयात केला. 

स्फोटक प्रकरणात पवारची नेमकी काय भूमिका आहे, हे समजू शकलेले नाही. त्याने शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे की नाही, याचा तपास करण्यासाठी त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी "एटीएस'ने न्यायालयात केली. 

"सनातन'चा प्रभाव 
अविनाश पवार कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. तो सनातन संस्था तसेच इतर हिंदुत्ववादी संघटनांना मानतो. दोन वर्षांपूर्वी या संघटनांच्या माध्यमातून तो या चौघांच्या संपर्कात आला. त्याच्या घरातून जप्त केलेला संगणकाचा "सीपीयू' आणि मोबाईल फोनमधील डाटाची तपासणी सुरू असल्याचेही "एटीएस'ने न्यायालयात सांगितले.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live