महिला रूग्णांवर आली नवजात बाळासह रस्त्यावर विश्रांती घेण्याची वेळ 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 24 जून 2018

वसमत तालुक्यातील सर्वात मोठं स्त्री रूग्णालय गेल्या 24 तासांपासून अंधारात आहे. विशेष म्हणजे  या रूग्णालयात विजेची कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे महिला रूग्णांवर नवजात बाळासह रस्त्यावर विश्रांती घेण्याची वेळ आलीय. 
हिंगोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालाय. 

इथल्या वसमत शहरात असलेलं महिला उपजिल्हा रुग्णालय गेल्या २४ तासापासून अंधारात आहे. रात्री झालेल्या वादळी वाऱ्यानं विजेच्या तारा तुटल्यानं वीजपुरवठा खंडीत झालाय. पण या रूग्णालयात विजेच्या बाबतीत कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे महिला रूग्णांचे अतोनात हाल होताय. उकाडा असह्य होत असल्यानं प्रसुत झालेल्या महिलांवर आपल्या नवजात बाळांसह रस्त्यावर विश्रांती घेण्याची वेळ आलीय. 

हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांना हा सगळा प्रकार समजल्यानंतर त्यांनी देखील रूग्णालय प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केलाय. रूग्णलयानं ही बाब गांभीर्यानं घेऊन विजेची व्यवस्था करावी अन्यथा आंदोलन छेडावं लागेल असा इशाराच त्यांनी दिलाय. 

राज्यातील गोर गरिब रूग्णांना कमी खर्चात वैद्यकीय सुविधा मिळावी म्हणून सरकारमार्फत या रूग्णालयांवर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र प्रत्यक्षात सुविधांअभावी रूग्णांना त्रासालाच सामोरं जावं लागतं. वसमतमधील हा प्रकार म्हणजे सरकारी अनास्थेचंच एक बोलकं उदाहरण. यातून यंत्रणांनी धडा घेणं अपेक्षित आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live