हिंगोलीत संतप्त आंदोलकांनी पोलिसांची जीप जाळली

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 जुलै 2018

हिंगोली ते कळमनुरी मार्गावर संतप्त आंदोलकांनी बासंबा (ता. हिंगोली) पोलिसांची जीप पेट्रोल टाकून पेटवून दिली आहे.

जिल्ह्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले असून जिल्ह्यातील मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातूनही वाहतूक बंद करण्यात आली आहे.हिंगोली ते कळमनुरी मार्गावरील खानापूर चित्ता हे संतप्त आंदोलन कर्त्यांनी बासंबा पोलिसांची जीप पेटून दिली आहे. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे शासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. याशिवाय कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावर पार्डी मोड, माळेगाव, शिवनी या ठिकाणी रस्त्यावर टायर जाळले आहेत.

वसमत इथे एक खाजगी बस आंदोलकांनी फोडली त्यानंतर रस्त्यावर टायर जाळून वाहतूक बंद केली. जिल्ह्यातील जवळा बाजार, कुरुंदा, वारंगा फाटा, औंढा नागनाथ, आंबा चोंडी, जवळा बुद्रुक, पळशी, या ठिकाणीही आंदोलन झाले आहे. सेनगांव तालूक्यातील जवळा बुद्रुक येथे आंदोलकांनी शाळा सोडून देत शाळेला कुलूप ठोकले आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live