अवघ्या साडेतीन वर्षीय तेजसने दिला हुतात्मा वडलांना अग्नि..

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 मे 2019

हिंगोली : औंढा तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील वय वर्ष अवघे साडेतीन वर्ष असलेल्या तेजस चव्हाण याला वडिलांच्या अंगा खांद्यावर खेळण्याच्या दिवसातच हुतात्मा झालेल्या वडिलांच्या चितेला अग्नी द्यावा लागला. शुक्रवारी (ता. 3) सदर चित्र पाहून उपस्थित हजारो गावकऱ्यांच्या डोळ्यात आश्रू उभे राहिले होते. 

हिंगोली : औंढा तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील वय वर्ष अवघे साडेतीन वर्ष असलेल्या तेजस चव्हाण याला वडिलांच्या अंगा खांद्यावर खेळण्याच्या दिवसातच हुतात्मा झालेल्या वडिलांच्या चितेला अग्नी द्यावा लागला. शुक्रवारी (ता. 3) सदर चित्र पाहून उपस्थित हजारो गावकऱ्यांच्या डोळ्यात आश्रू उभे राहिले होते. 

औंढा नागनाथ तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील हुतात्मा जवान संतोष चव्हाण यांचा सुमारे पाच वर्षापुर्वीच विवाह झाला होता. त्यांचा मोठा मुलगा तेजस साडेतीन वर्षाचा आहे तर एक लहान मुलगा अवघ्या सहा ते सात महिन्याचा आहे. दोन्ही मुलांचे वय वडिलांच्या अंगा खांद्यावर खेळण्याचे आहे. मात्र वडिल काय नोकरी करतात याची माहिती नसलेल्या तेजस व त्याच्या लहान भावाला वडिल गावी आल्यानंतर मात्र होत असलेला आनंद अवर्णनिय होता.

दिवसभर वडिलांच्या सोबतच खेळणे त्यांच्या सोबतच राहण्याचा हट्टा तेजस करीत असे. दरम्यान, गडचिरोली येथे झालेल्या घटनेची माहिती गावात मिळाल्यानंतर चव्हाण कुटुंबियांसह सारे गाव निःशब्द झाले. दोन रात्र गावकऱ्यांनी जागून काढल्यानंतर आज सकाळी हुतात्मा जवान संतोष चव्हाण यांचे पार्थिक गावात पोहोचले. यावेळी संतोष चव्हाण अमर  रहे, भारत माता की जय च्या  घोषणा सुरु झाल्या. मात्र या घोषणा व अंत्ययात्रा याची माहिती नसलेल्या तेजस मात्र निरागस भावनेने त्याकडे पहात होता. कधी वडिलांच्या छायाचित्राकडे तर कधी गर्दी कडे तो टक लाऊन पाहू लागला.

पुढे काय करायचे हे माहिती नसलेल्या तेजसला मात्र त्याच्या नातेवाईकांनी कडेवर घेऊन हुतात्मा जवान संतोष चव्हाण यांच्या चितेजवळ नेले. अवघ्या साडेतीन वर्षाच्या तेजसने अंत्यदर्शन घेऊन त्याने हुतात्मा जवान संतोष चव्हाण यांच्या चितेला अग्नी दिला. हे दृष्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यात आश्रू उभे राहिले. खेळण्या बागडण्याच्या वयात वडिलांच्या चितेला अग्नी देण्याची वेळ आलेल्या तेजसकडे पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले शिवाय मने हेलावून गेली होती.

Web Title: last rituals of martyard Santosh Chavan at Hingoli


संबंधित बातम्या

Saam TV Live