हिंगोलीत उष्माघाताचा तिसरा बळी; वसमत तालुक्यातील बारेपुरवाडीची घटना

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 एप्रिल 2019

हिंगोली : वसमत तालुक्यातील बारेपुरवाडी येथे एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली असून  या प्रकरणी सोमवारी (ता. 29) रात्री उशीरा अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात उष्माघाताचा तिसरा बळी आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील बारेपुरवाडी येथील सुनील लक्ष्मण कांबळे (वय 45)  यांनी रविवारी (ता. 28) दिवसभर शेतात काम केले. त्यानंतर सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. रात्री जेवण करीत असतांना त्यांना चक्कर आल्याने काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी विजयमाला सुनील कांबळे यांच्या माहितीवरून सोमवारी (ता. 29) कुरुंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. 

दरम्यान, हिंगोली जिल्हयात मागील काही दिवसांपासून तापमान चांगलेच वाढले असून उन्हाचा पारा ४५ अंशावर पोहोचला आहे. रविवारी (ता. 28) रोजी गिरगाव (ता.वसमत) व गोजेगाव (ता.औंढा नागनाथ) येथे दोघांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. त्यानंतर उष्माघाताचा हा तिसरा बळी आहे. तर उष्माघातामुळे  यापुर्वी पंधरा मेंढ्यांचाही मृत्यू झाला आहे.

Web Title: marathi news hingoli third death due to heat stroke in hingoli 

संबंधित बातम्या

Saam TV Live