VIDEO | हिंगोलीमध्ये वाघाचा 5 शेतकऱ्यांवर हल्ला

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

सेनगाव (हिंगोली)  : सेनगाव तालुक्यातील सुकळी खुर्द येथे वाघाच्या हल्ल्यात तरुण जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. २) दुपारी एक वाजता घडली आहे. त्यामुळे आता सेनगाव तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सेनगाव (हिंगोली)  : सेनगाव तालुक्यातील सुकळी खुर्द येथे वाघाच्या हल्ल्यात तरुण जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. २) दुपारी एक वाजता घडली आहे. त्यामुळे आता सेनगाव तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सेनगाव तालुक्यातील सुकळीखुर्द येथील संतोष श्रीराम कबाडे (वय २८) यांचे गावालगत शेत आहे. आज सकाळी कबाडे, रमेश आठवले, भगवान शिरसाट हे शेतात सोयाबिनचे पिक गोळा करण्यासाठी कबाडे यांच्या शेतात गेले होते. शेतातील तुरीच्या ओळींमधे कापून  ठेवलेल सोयाबिन जमा करीत असताना तुरीमधून आलेल्या वाघाने कबाडे यांच्यावर पाठीमागून हल्ला केला.

दरम्यान, यामध्ये कबाडे यांच्या खांद्याला व पाठीला वाघाचा पंजा लागला. यामुळे ते जखमी झाले. अचानक झालेल्या हल्ल्याने कबाडे यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील शेतकरी मदतीसाठी धावून आले. त्यानंतर वाघाने तेथून धुम ठोकली. त्यानंतर शेतकऱ्यांनी जखमी असलेल्या कबाडे यांना उपचारासाठी सेनगाव येथे खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे.

संजय राऊत EXCLUSIVE | संजय राऊत यांचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल...

सदर वाघ गावाजवळच आल्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, वन परिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक, शेख जमील यांनी तातडीने सुकळी येथे भेट देऊन पाहणी केली आहे. हिंगोली नंतर आता सेनगाव तालुक्यात वाघाची दहशत निर्माण झाली आहे.

Web Title: Young man injured in tiger attack


संबंधित बातम्या

Saam TV Live