येथे कार्यकर्ते भाड्याने मिळतील; सांगलीत झळकला हटके फलक

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 3 जुलै 2018

निवडणूक जवळ आली की झेंडे, बॅनर्स, टोप्या असं निवडणूक साहित्य पुरवणाऱ्या दुकानांचा थाट लागतो. पण सांगलीत एक अनोखा फलक सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. 'इथे कार्यकर्ते भाड्यानं मिळतील' अशा आशयाचा फलक सध्या चांगलाच चर्चेत आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक 1 ऑगस्ट रोजी होतेय. या फलकावर एका कार्यकर्त्याचे एका दिवसाचे भाडे एक हजार रुपये असल्याचं लिहीलंय. ते कुणी गंमतीने लिहीलंय की खरंच असा उद्योग सुरु झालाय याची काहींनी खातरजमा केली. त्यात संबंधीत फलक हा गंमतीचा भाग नसून खरोखरच भाडोत्री कार्यकर्ते पुरवणारे ठेकेदार नेत्यांशी संपर्क साधून असल्याचे दिसून आलं. 

दोन दिवसांपासून ढोल ताशांच्या गजरात इच्छुकांच्या मुलाखतींचा फेर सुरू आहे. एकेका इच्छुकाच्या मिरवणुकीत पाचशेपासूनच्या हजारापर्यंत "समर्थक' कार्यकर्ते दिसत आहेत. ही बहुतांश गर्दी ही भाडोत्री कार्यकर्त्यांची आहे. 

निवडणूक म्हटली की शक्तिप्रदर्शन आणि कार्यकर्त्यांचा गोतावळा आलाच. पण ही गर्दी कशी जमवायची, कार्यकर्ते भाड्यानं देण्यासाठी काय पॅकेज ठरवायचं हे सांभाळणारे अघोषित ठेकेदार राजकीय व्यवस्थेत तयार झालेत. हा फलक राजकारणाचं अधःपतन करणारा म्हणायचा की राजकीय बाजारातील मागणी तसा पुरवठा करणारा मॉल म्हणायचा? असाच प्रश्न विचारावासा वाटतो.

संबंधित बातम्या

Saam TV Live