क्रिकेट वर्ल्डकपमधील भारत पाकिस्तान सामन्यांचा आतापर्यंतचा इतिहास

क्रिकेट वर्ल्डकपमधील भारत पाकिस्तान सामन्यांचा आतापर्यंतचा इतिहास

भारत-पाकिस्तान प्रत्येक सामना नेहमीच ‘हाय-व्होल्टेज’ असतो.  आणि त्यातही वर्ल्डकपचा सामना म्हंटलं, तर आईस ऑन द केक. यंदाही असाच योग जुळून आलाय, तो साहेबांच्या देशात. निमित्त आहे वर्ल्ड कपचं. केवळ भारत-पाकचे फॅन्सच नव्हे तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं या रणसंग्रामाकडे लक्ष  लागलेलं आहे. तसं पाहायला गेल्यास भारत-पाकिस्तान सख्खे शेजारी. पण क्रिकेटसाठी तितकेच कट्टर प्रतिस्पर्धी. आमनेसमाने आलेत की प्रतिष्ठेची लढाई ही ठरलेलीच. अन् त्यात वर्ल्डकपचा सामना म्हंटला तर नादच नाही.!

क्रिकेट वर्ल्डकपमधील आतापर्यंतचा इतिहास हा भारताच्याच बाजूने आहे. 1992 पासून रंगीत वर्ल्डकपला सुरूवात झाली. अन् पाकिस्तानचे वासे फिरले, ते आजतागायत. जेव्हा जेव्हा पाकिस्तानने भारतावर कुरघोडीचा प्रयत्न केला.. तेव्हा तेव्हा टीम इंडियाने त्यांचे दात घशात घालण्याची जबाबदारी इमानेइतबारे पार पाडली.

वन डे वर्ल्डकपच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत सहावेळा भिडलेत.. विशेष म्हणजे सहाही वेळा भारतीय संघाने पाकिस्तानवर निर्विवाद वर्चस्व गाजवलंय.1992 साली वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक भिडले.त्यावेळी कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने 43 धावांनी पाकचा पराभव केला.तर 1996 साली भारतीय उपखंडात झालेल्या वर्ल्डकपमध्ये, टीम इंडिया 39 धावांनी विजयी झाली.1999मध्ये इंग्लंडमध्येही भारताने पाकिस्तानचा 47 धावांनी धुव्वा उडवला.2003 साली दक्षिण आफ्रिकेत भारताने पाकिस्तानवर 6 विकेट्सने मात केली.तर 2011मध्ये धोनी ब्रिगेडने 29 धावांनी पाकिस्तानचा पराभव करत, थेट वर्ल्डकपची फायनल गाठली.2015मध्ये ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया 76 धावांनी विजयी झाली होती.त्यामुळे वर्ल्डकपमध्ये विजयाचा सिक्सर लगावणाऱा भारत, यंदाही विजयी घोडदौड कायम राखून सत्ता कायम राखणार का? याचीच प्रत्येक फॅनला उत्सुकता लागून आहे.


2007 वर्ल्ड कपचा अपवाद वगळता सातत्याने भारताने पाकिस्तानचा चारीमुंड्या चित केलं.भारतीय संघाने विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानवर गाजवलेलं निर्विवाद वर्चस्व.निश्चितच विराट ब्रिगेडलाही स्फुरण देणारं ठरणार आहे.त्यामुळे मॅन्चेस्टरच्या रणांगणातही इतिहासाची पुनरावृत्ती करत तिरंगा डौलानं फडकेल, हाच विश्वास तमाम क्रिकेट फॅम्सना आहे.
 

web tittle: History of India Pakistan matches Cricket World Cup

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com